BhaktiVed
ॐ

जे का रंजले गांजले

abhangరచన: संत तुकाराम (Sant Tukaram)

ఈ పాఠం ఇంకా సరిచూడబడలేదు.

जे का रंजले गांजले।

त्यासी म्हणे जो आपुले॥

तोचि साधु ओळखावा।

देव तेथेचि जाणावा॥

मृदु सबाह्य नवनीत।

तैसे सज्जनांचे चित्त॥

ज्यासी आपंगिता नाही।

त्यासी धरी जो हृदयी॥

दया करणे जे पुत्रासी।

तेचि दासा आणि दासी॥

तुका म्हणे सांगू किती।

तोचि भगवंताची मूर्ती॥

ఈ పాఠానికి వీడియో లేదు.YouTubeలో వెతకండి
మూలం: Tukaram Gatha, abhang; standard text