BhaktiVed
ॐ

माझे माहेर पंढरी

abhangరచన: संत एकनाथ (Sant Eknath)

ఈ పాఠం ఇంకా సరిచూడబడలేదు.

माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी।

बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई।

माझे माहेर पंढरी।

पुंडलिक राहे बंधु, त्याची ख्याती काय सांगू।

माझे माहेर पंढरी।

माझी बहीण चंद्रभागा, करितसे पाप भंगा।

माझे माहेर पंढरी।

एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण।

माझे माहेर पंढरी।

ఈ పాఠానికి వీడియో లేదు.YouTubeలో వెతకండి
మూలం: Eknath abhang; standard text

ఇవి కూడా చదవండి