BhaktiVed
ॐ

धरिला पंढरीचा चोर

abhangరచన: संत जनाबाई (Sant Janabai)

ఈ పాఠం ఇంకా సరిచూడబడలేదు.

धरिला पंढरीचा चोर।

गळा बांधोनिया दोर॥

हृदय बंदिखाना केला।

आत विठ्ठल कोंडिला॥

शब्दे केली जडाजुडी।

विठ्ठल पायी घातली बेडी॥

सोहं शब्दाचा मारा केला।

विठ्ठल काकुळती आला॥

जनी म्हणे बा विठ्ठला।

जीवे न सोडी मी तुला॥

ఈ పాఠానికి వీడియో లేదు.YouTubeలో వెతకండి
మూలం: Janabai abhang; standard text

ఇవి కూడా చదవండి