BhaktiVed
ॐ

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल

abhangరచన: संत नामदेव (Sant Namdev)

ఈ పాఠం ఇంకా సరిచూడబడలేదు.

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल।

देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल।

बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल।

निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल॥

नामा म्हणे मज विठ्ठल सापडला।

म्हणोनि कळिकाळा पाड नाही॥

మూలం: Namdev Gatha, abhang; standard text

ఇవి కూడా చదవండి