BhaktiVed
ॐ

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

abhangరచన: संत तुकाराम (Sant Tukaram)Abhang; Pandharpur wari

ఈ పాఠం ఇంకా సరిచూడబడలేదు.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी।

कर कटावरी ठेवोनिया॥

तुळसीहार गळा कासे पीतांबर।

आवडे निरंतर हेचि ध्यान॥

मकरकुंडले तळपती श्रवणी।

कंठी कौस्तुभमणि विराजित॥

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख।

पाहीन श्रीमुख आवडीने॥

మూలం: Tukaram Gatha, abhang; standard text

ఇవి కూడా చదవండి